Wednesday, August 11, 2010

dedicated to someone very special....
माझं स्वप्न . ....


मी पाहिलेलं न माझ्या मनाला आवडलेलं
माझं एक स्वप्न आहे
तू जीवनात यशस्वी व्हावास आणि
तुझ्या यशात माझं यश सामावून घ्यावस

तुझ्या त्या यशाला
सीमा कुठल्याच नसतील
कारण,
तुझ्या आधी जाऊन
मी त्या पुसल्या असतील

प्रयत्न करताना
तू कधीतरी थकशील
पण कंटाळा हि विसरशील
कारण,
दुःखाचे घाट मी पेलीन
आणि तुझ्या वाटेत
सुखाच्या पायघड्या अंथरीन

माझ्या मूळे यशाकडे
तू कधी दुर्लक्ष केलास
तर
तुझ्या जीवनातून
आपोआप बाजूला होईन
आणि तुझा मार्ग सुकर करीन


कारण
आयुष्यात एकाच स्वप्न आहे
तू यशस्वी व्हावस
आणि तुझ्या यशात
माझं यश सामावून घ्यावस.


- माधुरी पाटील

No comments:

Post a Comment