Friday, October 15, 2010

स्वप्न आणि सत्य

एकदा स्वप्न आणि सत्य यांचे जोरदार भांडण झाले.
विषय होता भविष्य घडविण्यात सर्वाधिक सहभाग कोणाचा. 
दोघे ही खुप भांडले, झगडले पण निर्णय काही होईना. 
शेवटी या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी ते आपल्या मानसपित्याकडे- ब्र्म्हदेवाकडे गेले. ब्र्म्हदेवाने त्यांना सांगितले, "ज्या कोणाचे हात आभाळाला टेकतील आणि तरीही ज्याचे पाय जमिनीवर आसतील, त्याचा भविष्या घडविण्यात निर्णायक सहभाग असतो".


दोघेही परत आले. स्वप्नाने आधी प्रयत्न केला.
 एकच उडीत त्याचे हात आभाळाला टेकले, पण त्याचे पाय जमिनीपसुन केंव्हाच उचलले गेले होते. 
सत्याने नंतर प्रयत्न केला. त्याचे पाय कायम जमिनीवर होते, पण त्याचे हात आभाळापर्यंत कधीच पोचु शकले नाहीत. 


दोघांनीही खुप प्रयत्न केले, पण दोघांपैकी कोणीच यशस्वी होउ शकले नाही. 
थकुन परत एकदा ते ब्रम्हदेवाकडे गेले, आणि या वेळेस ब्रम्हदेवाने त्यांना सांगितले, "भविष्य घडविण्यात सत्य, आणि स्वप्न या दोघांचाही सहभाग तितकाच मोलाचा असअतो. 
खर्‍या अर्थाने यशस्वी भविष्य घडवायचे असेल, तर स्वप्नाला सत्याच्या खांद्यावर उभे रहयला हवे!."

प्रेम आणी computer वेड

वर्गात नेहमी खुन्नस देता देता
दिलीस एकदा सुन्दर smile
उघडशील का माझ्या "pritee"ची
एक एक Backup File.

जेव्हा तुला पहातो तेव्हा
hang होते माझी hard Disk
माझी OS ही सांगते मला
घेतली आहेस मोठी Risk.

Risk Management क़ेलेय मी
Estimate ही काढला आहे.
थोडे Reengineering करावे लागेल
तुझा माझा समेट एवढा एकच पर्याय आहे.

फक्त एकदाच पहायचे आहे
तुझ्या ह्रुदयात Login करुन
Delete करायचेत सगळे Folder
फक्त माझ्या नावाचा Folder राखुन.

Antivirus बनेन तुझ्यासाठी
वाचवेन तुला Spam पासुन
एकच mail कर माझ्या mailवर
वाट बघतोय कधीपासुन.

म्हणणे फक्त एवढेच आहे
आशा करतो तुझी इच्छा ही असावी
कोणी visit द्यायचे म्हटले
तर तुझी माझी URL एकच असावी...

घरापासून दूर

मी घरी कीतीही दिवसभर दंगा केला
तरी मला आई थोपताल्याशिवय कधीच झोपली नाही
घरापासून दूर म्हणुनच आता कदाचित
शांत झोप कधी लागलीच नाही.

कुणी वीचारते "तुला घरी जाऊस वाटत नाही"?
कसा सांगू त्यांना घरातून निघताना
आईला मारलेली मीठी सोडवत नाही.

आई तू सांगायची गरज नाही
तुला माझी आठवण येते
आता माझ्यासाठी डब्बा करायचा नसतो
तरीही तू सहा वाजताच उठतेस.

तुझ्या हातचा चहा तुझ्या हातची पोली
तुझ्या हातची माझी न आवडती भाजी खायला
आजही जीभ आसुसली.

घरापासून दूर .......
आई जग खुप वेगले आहे
तुझ्या सावलीत अगदी बिनधास्त होतो
आता रानागानत उन आहे

तू आपल्या पील्लान साठी
सगला केलस एक दीवस पिल्लं म्हणाली
आई आता आम्हाला जायचय
आंनी तू त्यांना जाऊ दीलस
आई तू इथे नाहीस
बाकी माझ्याकडे सगळे आहे
घरापासून दूर
जग खुप वेगले आहे.

ऐक कविता