Monday, August 9, 2010

कळलच नाही . . .

कळलच नाही . . .
तुझ्या डोळ्यात पाहताना मी कधी
हरवले
कळलच नाही . . .
तुला हसताना पाहताना
तुझ्या हसण्यावर कधी वेडी झाले
कळलच नाही . . .
मी तर माझ्या वाटेने जात होते
कधी वाट चुकली ते
कळलच नाही . . .
तुझ मन चोरण्याआधी
माझं मन कधी हरवलं
कळलच नाही . . .
आहे फक्त तुझ्या माझ्या
आठवणीचा सहवास. . .
कधी डोळ्यातून पाणी आल
कळलच नाही
खरच खूप सावरल स्वतःला
पण कधी कालच नाही. . .
कळलच नाही . . .

- माधुरी पाटील

No comments:

Post a Comment