Tuesday, June 29, 2010

प्रेमात पडल की असच होणार....!

प्रेमात पडल की असच होणार....!
दिवस रात्र डोळ्यासमोर तोच चेहरा दिसणार,
स्वप्नात सुद्धा आपल्या तीच व्यापुन उरणार
येता जाता उठता बसता,
फ़क्त तीचीच आठवण येणार
तुमच काय, माझ काय,
प्रेमात पडल की असच होणार!

डोळ्यात तीच्या आपल्याला, स्वप्न नवी दिसणार,
तीच्या हास्यातुन आपल्यासाठी चान्दणे साण्डणार
ऐश्वर्याचा चेहरा सुद्धा मग;
तीच्यापुढे फ़ीका वाटणार
तुमच काय, माझ काय,
प्रेमात पडल की असच होणार!

तीच्या फोनची आपण दिवसभर वाट बघणार,
मित्रान्समोर मात्र बेफ़िकीरी दाखवणार
न रहावुन शेवटी आपणच फ़ोन लावणार्,
तीचा आवाज ऐकुन सार राग् विसरणार
तुमच काय, माझ काय,
प्रेमात पडल की असच होणार!

मेसेजनी तीच्या inbox आपला भरुन जाणार्,
तीचा साधा meesage सुध्दा आपण जतन करुन ठेवणार्,
प्रत्येक sent mesage पहिला तीलाच forward होणर,
तुमच काय, माझ काय,
प्रेमात पडल की असच होणार!

एक तरी मैत्रीण असावी. . .

एक तरी मैत्रीण असावी
बाईकवर मागे बसावी
जुनी हीरो होंडा सुद्धा मग
करिझ्माहून झकास दिसावी !

एक तरी मैत्रीण असावी
चारचौघीत उठून दिसावी
बोलली नाही तरी निदान
समोर बघून गोड हसावी !

एक तरी मैत्रीण असावी
कधीतरी सोबत फिरावी
दोघांना एकत्र पाहून
गल्लीतल्या सगळ्या पोरांची जिरावी !

एक तरी मैत्रीण असावी
जिच्याशी निर्मळ संवाद असावा
कधीतरी छोट्या भांडणाचा
एखादाच अपवाद असावा..

एक तरी मैत्रीण असावी
आयुष्याच्या अनोळखी वळणावर
तुमच्या व्यथा वेदनांवर..........

मायेच्या हळव्या. . .

मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते ,नात्यांच्या बंधात धुंद मोहरते..

मन उधाण वाऱ्याचे गुंज पावसाचे ,का होते बेभान कसे गहिवरते...

मन उधाण वाऱ्याचे ...



आकाशी स्वप्नांच्या हरपुन पान शिरते,

हुरहुरत्या सांजेला कधी एकटेच झुलते,

सावरते बावरते झडते अडखळते का पडते..

कधी आशेच्या हिंदोळ्यावर मन हे वेडे झुलते..

मन तरंग होउन पाण्यावरती फ़िरते..

अन क्षणात फिरूनी अभाळाला भीडते..

मन उधाण वाऱ्याचे...



रुणझुणते गुणगुणते कधी गुंतते हरवते..

कधी गहिऱ्या डोळ्यांच्या डोहात पार बुडते..

तळमळते सारखे नकळत का भरकटते..

कधी मोहच्या चार क्षणांना मन हे वेडे भुलते..

जाणते जरी हे पुन्हा पुन्हा क चुकते..

भाबडे तरी भासांच्या मागुन पळते..

मन उधाण वऱ्याचे..

आठवतो आपला श्वास

आठवतो आपला श्वास जसा
एकमेकांत मिसळला होता
भर दुपारच्या रखरखत्या ऊन्हात
कसा चांदण्यांचा पाऊस कोसळला होता

वाटलं नव्हतं ह्रुदय तुटलं तर
इतकं दुःख सोसावं लागेल
आज पर्यंत श्वासांनी मला, पण
यापुढे त्यांना पोसावं लागेल

तुझ्या आठवणींच्या साखर झोपेत
माझी कालची रात्र गोडव्यात सरली
पुर्वी स्वप्नांच्या जत्रेत मन जायचं, पण
काल स्वप्नांनीच मनात जत्रा भरली

'प्रेम' ..... शब्ध दोन अक्षरांचा
नुसता ऐकला तरी हर्ष होतो
आणि ऊच्चारला तर
दोन ओठांमध्ये स्पर्श होतो

तुझ्या डोळ्यातील इवलासा अश्रू
मला समुद्राहून खोल वटला
कारण मीचं होतो म्हणून
माझ्या डोळ्यात समुद्र दाटला

माझं दुःख बघवलं नाही
म्हणून एक ढग रडत होता
तुमचं आपलं काहीतरीचं
म्हणे तेंव्हा पाऊस पडत होता

Friday, June 25, 2010

एक प्रवास मैत्रीचा

एक प्रवास मैत्रीचा
जश्या हळुवार पावसाच्या सरींचा
ती पावसाची सर अलगद येवुन जावी
अन एक् सुंदरशी संध्याकाळ हळुच खुलुन यावी..
एक प्रवास सहवासाचा
जणु अलगद पडणार-या गारांचा
न बोलताही बरच काही सांगणारा
अन स्पर्श न करताही मनाला भिडणारा..

एक प्रवास शुन्याचा
जणु हीमालयाशी भिडण्याचा
शुन्यातुन नवे जग साकारणारा
अन नव्या निर्मितीची चाहुल देणारा..

एक प्रवास जगण्याचा
क्षणा क्शणाला माणुस घडवण्याचा
हसता हसता रडवणारा
अन रडवुन हळुच हसवणारा..

एक प्रवास प्रेमाचा
भुरभुरणार-या दोन जिवांचा
जिंकलो तर संसार मांडायचा
अन हरलो तर नवीन वाटा शोधायच्या..

एक प्रवास प्रयत-नांचा
सुख़ दुख़ातील नाजुक क्षणांचा
अखंड घडवणार-या माणुसकीचा
अन नवी उमेद देणार-या घडींचा..

एक प्रवास..
तुमच्या आमच्या आवडीचा
साठवु म्हंटले तर साठवणींचा
आठवु म्हंटले तर आठवणींचा
इथे हळुच येवुन विसावलाय..एक प्रवास

Monday, June 21, 2010

माझ standard वाढु लागलय

एक रुपयाचा विचार करणार मन
आता हजार रुपयेही उडवु लागलय
छोट्या दुकानात घुटमळणार् पाऊल
आता ए.सी शोरूम कडे वळु लागलय्....
कारण
आता माझ standard वाढु लागलय...

पाणीपुरीचा आस्वाद घेणार मन
आता McDonald's चा pizza खाऊ लागलय्
कसाटा खाण्याऱ्या जीभेवर हल्ली
महागड Ice-cream विरघळु लागलय....
कारण
आता माझ standard वाढु लागलय...

"वन रूम kitchen"मध्ये राहणार मन
आता प्रशस्त flatसाठी धडपडु लागलय्
लोकलच्या गर्दित धक्का खाता खाता
आता Mercedes-Benz मधुन स्वारी करु लागलय्....
कारण
आता माझ standard वाढु लागलय...

जे मिळेल त्यात समाधान् मानणार मन
आता थोडं choosy बनु लागलय
स्वप्नात बघितलेल्या दुनियेला खऱ्याआर्थाने
आता प्रत्यक्षाच स्वरुप् येऊ लागलाय्....
कारण
आता माझ standard वाढु लागलय...

तसं तर् गरीबी आणि श्रीमंतीने
समानतेनेच घरी पाणी भरलय..
पण श्रीमंतिपेक्षा गरिबीमुळे जीवनाला
कसं जगायच हे कळलयं...
म्हनुणच ....
कदाचित मनाप्रमाणे अंगातलही बळ वाढलय....
कारण .....
आता माझ standard वाढु लागलय.

कसे सरतील सये...

कसे सरतील सये माझ्याविन दिस तुझे ?
सरताना आणि सांग सलतील ना !
गुलाबाची फुलं दोन रोज राती डोळ्यावर
मुसुमूसू पाणी सांग भरतील ना !...

पावसाच्या धारा धारा... मोजतना दिस सारा
रिते रिते मन तुझे उरे...
ओठ भर हसे हसे... उरातून वेडेपिसे
खोल खोल कोण आता झुरे ?
आता जरा अळीमीळी
तुझी माझी व्यथा निळी
सोसताना सुखावून हसशील ना !...

कोण तुझ्या सौधातून उभे असे सामसूम
चीडिचुप... सूनसान दिवा !
आता सांज ढळेलच आणि पुन्हा छळेलच
नभातून गोरा चांदवा !!
चांदण्याचे कोटीकण
आठवांचे ओले सण
रोज रोज नीजभर भरतील ना !...

इथे दूरदेशी माझ्या सुन्या खिडकीच्यापाशी
झडे सर... काचभर तडा !
तूच तूच... तुझ्या तुझ्या... तुझी तुझी
सारा सारा तुझा तुझा सडा !!
पडे माझ्या वाटेतून
आणि मग काट्यातून
जातानाही पायभर मखमल ना !...

आता नाही बोलायचे... जरा जरा जगायचे
माळुनिया अबोलीची फुले !
देहभर हलू देत... विजेवर झुलु देत
तुझ्या माझ्या विरहाचे झुले !!
जरा घन झुरु दे ना
वारा गुदमरु दे ना
तेव्हा नभ धरा सारी भिजवील ना !...

कँटीन मधला चहा

कँटीन मधला चहा आणि
चहा सोबत वडा पाव
पैसे कुठ्ले खिशात तेव्हा
उधारीचचं खातं राव !

कट्ट्यावर बसणं लेक्चर चुकवून
आणि पोरींची चेष्टा करणं
दिसलीच एखादी चांगली तर
तिला लांबूनच बघून झुरणं !

बसलोच चुकून लेक्चरला तर
शेवटचा बाक ठरलेला
कुणाच्या तरी वहीतलं पानं
आणि पेन सुध्दा चोरलेला !

परिक्षा जवळ आली
कि मात्र रात्री जागायच्या
डोळ्यात स्वप्नं उद्याची
म्हणून झोपाही शहाण्यासारख्या वागायच्या !

पूर्ण व्हायचं एक वर्तुळ
एक वर्ष सरायचं
पुन्हा नव्या पाखरांसोबत
जुनं झाड भरायचं.

अशी वर्तुळ भरता भरता कळलं
अरे कागदच भरला !
वर्तुळ झाल्या कागदाला
फ़क्त सलाम करायचा उरला !!

पुन्हा नविन रस्ता
पुन्हा नविन साथी
जुन्या रस्त्याच्या , प्रवासाच्या
फ़क्त आठवणीच हाती

दोन चिमण्या

दोन चिमण्या भेदरलेल्या

वादळ वाऱ्याला घाबरलेल्या

थरथरणारं काळीज घेऊन

वळचणीला बसलेल्या

चिमणी म्हणाली चिमण्याला

कशी तोंड देऊ या तुफानाला

वाटते मज भीती आता

होणार काहीतरी जिवाला

चिमणा म्हणाला चिमणीला

भिऊ नको घाबरू नको

मी आहे ना

तुझ्या संगतीला सोबतीला

पुन्हा पंखांत बळ येईल

दुबळं का होईना

थोडसं उडता येईल

तुला मला लागेल इतका

चिमणचारा मला

नक्कीच आणता येईल

पुन्हा सांगतो दु:ख करू नको

जे तुझं नाही त्याकडे पाहू नको

मी तुझ्यासाठी आणि तू माझ्यासाठी

हे कधी विसरू नको

त्यानं प्रेम केलं किंवा तिनं प्रेम केलं

त्यानं प्रेम केलं किंवा तिनं प्रेम केलं,
करु दे की...
मला सांगा तुमचं काय गेलं ?

तो तिला बागेमधे एकांतात भेटला,
नको इतक्या जवळ जाउन अंगाशी खेटला,
लाल लाल गुलाबाचं फ़ुल होवुन पेटला,
भेटला तर भेटुदे की,पेटला तर पेटुदे की,
तुमच्या घरचं बोचकं त्यांनी उचलुन थोडचं नेलं?

त्यानं प्रेम केलं किंवा तिनं प्रेम केलं,
करु दे की...
मला सांगा तुमचं काय गेलं ?

एकदा ती त्याच्यासाठी वेडीपिशी झाली,
पाउस होता तरी भिजत त्याच्या घरी गेली,
घरात तेव्हा कोणी नव्हतं म्हणुन त्यांचं फ़ावलं,
आणि त्यानी तिला घरात घेउन चक्क दार लावलं,
लावलं तर लाउदे की,व्हायचं ते हो उदे की,
खिडकीतुन फ़ुकट सगळं बघता तर आलं,

त्यानं प्रेम केलं किंवा तिनं प्रेम केलं,
करु दे की...
मला सांगा तुमचं काय गेलं ?

घरात जागा नसते,त्यांचं चालणारच टॅक्सित प्रकरणं,
ते थोडेच बसणार आहेत,पाणिनीचं घोकीत व्याकरणं,
गुलाबी थंडीचे परीणाम हे होणारचं,
कुणितरी कोणालातरी घट्ट मिठितं घेणारचं
घेतलं तर घेउ दे की,व्हायचं ते हो उदे की,
तुमच्या आमच्या पूर्वजांनी आणखी वेगळं ते काय केलं,

त्यानं प्रेम केलं किंवा तिनं प्रेम केलं,
करु दे की...
मला सांगा तुमचं काय गेलं ?

Sunday, June 20, 2010

मैत्री

मैत्री म्हणजे मायेची साठवण,
मनाने मनाला दिलेली प्रेमाची आठवणहा धागा नीट जपायचा असतो,
तो कधी विसरायचा नसतो कारण ही नाती तुटत नाहीत,
ती आपोआप मिटून जातातजशी बोटांवर रंग ठेवून फुलपाखरे हातून सुटून जातात.

इतिहासाचं चंदन उगाळायला गेलं तरआयुष्य खूप सुंदर
आहेबघायला गेलं तर
दु:खातही सुख आहेजगायला गेलं तर
अश्रूंतही एक समाधान आहेवाटायला गेलं तर
समाधानातही चिंता आहेजपायला गेलं तर
काट्यांतही मखमल आहेसोसायला गेलं तर
फुलां कडूनही जख्म आहेकुस्करायला गेलं तर
अपयशातही नवी आशा आहेपचवायला गेलं तर
यश खूपच क्षणिक आहेउमजायला गेलं तर
मातीतच खरं सोनं आहेशरीर श्रमाने माखल्यावर
रत्नांची शेवटी मातीच होतेफुलांनी शरीर झाकल्यावर
निखाऱ्यांवर चालावं लागतंकापसावर उतानी पडल्यावर
वेदनांशी स्पर्धा करावी लागतेहास्य चेहऱ्या मागे दडल्यावर
कल्पना शक्तीचं प्रगती आहेविज्ञानाचे धडे चाळायला गेलं तर
प्रगतीच विनाशाचं कारण आहेइतिहासाचं चंदन उगाळायला गेलं तर
"त्यागा" पुढे सारचं शुल्लक आहेविचारात गीतासार साठवला तर
उदार वृत्ती कधी कधी घातक ठरतेसुर्यपुत्र कर्ण आठवला तर....
खरचं आयुष्य ज्या थोड्यांना कळलंत्या भाग्यवंतांचं ठीक आहेउरलेल्यांसाठी एकचं प्रश्न.... पणअगणित उत्तरांचं पीक आहे

Saturday, June 19, 2010

♥ ♥♥ फक्त तुझ्याच ♥♥♥

माझ्याशी बोलायची,
रोज गोड हसायची,
कधी कधी माझी
वाट बघत थांबायची....

दुसरी एकही मुलगी
माझ्याशी कधी बोलायची नाही,
ही पोरगी मात्र
माझी पाठ कधी सोडायची नाही....

तिच्या आयुष्यातल्या गमती
ती रोज मला सांगायची,
मी नवी लिहिलेली कविता
सारखी वाचायला मागायची....

एकदा मला म्हणाली
"तू माझ्यावर कध्धीच कविता करत नाही !"
तेव्हा मला समजलं....
तिला माझी एकही कविता कळत नाही

Wednesday, June 9, 2010

तु नसताना

तु असताना तुझाशी,
खुप खुप बोलायचं ठरवतो,
मुक्या भावनांना,
शब्दात बसवायचं ठरवतो,
चार ओळी जोडुन
कवीता करायची ठरवतो,
पण तु आलीस की,
शब्द अबोल होतात,
मन मात्र बोलयला लागत
तु नसताना मात्र
मुक्या भावनांनचे शब्द होतात,
आपसुक चार ओळींची कविता होते,
एक गोष्ट मात्र नक्की
तुझ्या असण्यापेक्शा तुझ्या,
नसण्यातच मी जास्त जगतो.......

अल्कोहोल - एक जीवन....

मावळताना सूर्य रोज
काहीतरी खुणावितो
आली रात्र पुन्हा आज
अल्कोहोलची आठवण देतो..

कोणी त्या शहाण्याने
अशी नशा बनविली
रात्रीपुरती का होईना
अल्कोहोलची साथ मिळाली..

प्यावी पाण्यात ती जर
अशी वेगळी येते मजा ..
मिसळली शीत-पेय तर
रात्रीपुरती होते नशा..

दुखाचा तो विसर जसा
अल्कोहोल करुनी देतो
बैठकीतच जिंकतो जग आपण
ताकद ती अल्कोहोल देतो..

विरहाच्या दुखाला त्या
अल्कोहोल भूलावितो
गेले प्रेम सोडूनी जरी
अल्कोहोल मात्र साथ देतो...

एक लार्ज पेग पिताच
तुझ्या आठवणीचा विसर पडतो
जाते रात्र पेग वर पेग पिण्यात
विरहाला या असेच मी भूलावितो..

झाली नष्ट दुनिया जरी
अल्कोहोल साथ सोडणार नाही
प्रेमातच मिळेल धोका सदा
अल्कोहोल दगा देणार नाही..

केले प्रेम जिच्यावर जीवापाड
तिने मला आज नाकारले
आले अल्कोहोल सोबतीला आज
अल्कोहोलास सर्वस्वी मी मानले...अल्कोहोलास सर्वस्वी मी मानले....

खंत.....

एकेकाळचे स्वराज्याचे शिलेदार आम्ही,
शिवबाच्या राज्याचे चाकर आम्ही....
गेली राजेशाही, आली लोकशाही,
झालो नेत्यांच्या ताटाभोवतीचे मांजर आम्ही....

हरवलेय ती सकाळची प्रार्थना,
'कराग्रे वस्ते लक्ष्मी' म्हणत सुरु व्हायचा दिनक्रम...
बोलतो आता, तुझमे रब दिखता है,
बस्स....तुम और हम......

ती एकत्र कुठुम्बे पाहण्यात येतच नाहीत...
आजी-आजोबांच्या राम-कृष्ण कथा येकताना मुले दिसतच नाहीत....
विडिओ-गेम, एडियट बॉक्स ने पुरती वाट लावलेय.....
काडीची ना अक्कल नि जाड भिंगाचा चष्मा लागलाय.....

तरुणाईची देशभक्ति, देशप्रेम कमी झालय,
त्याची जागा भलत्याच प्रेमाने घेतलेय....
गुंडगिरी करून जो तो शेर बनायला बघतोय,
अफु, चरस, गांजाचा झुरका घेत मरणाला मात्र कवटाळतोय....

सांस्कृतिक सनांचे दिवस आता संपलेत,
'वाजवा रे...' बोलून डिजेच्या तालावर जे ते नाचू लागलेत....
शहानपणा शिकविनारे वेडे ठरलेत,
वेडेपणा करणारे आपलीच लाल करू लागलेत....

'जय किसान' चा नारा फ़क्त निवडनुकांआधी दिसतोय,
हाय! हाय! करत शेतकरी येथला मरतोय....
ना कुणाला खंत.....का नाही माणुसकीची जाण???
जिवंत ह्या मुडदयांना तरीही वाटतेय का स्वताची शान...???

Tuesday, June 8, 2010

कापसाची वात आणि पणतितलं तेल


मातीच्या पणतिला कापसाचि वात
तरिही जळावं मात्र तेलाला लागतं
जळून संपलं तेल कि पणति राहते तशीच
कापसाच्या वातीला तेव्हा राख व्हावं लगतं.....

असंच तर नसेल ना रे तुझं-मझं नातं?
कापसाची वात आणि पणतितल्या तेला सरखं.....

माझ्याशिवाय तु अधुराच,
तुझ्यानेच तर मझं अस्तित्व दिसतं
तुझ्या-मझ्या शिवाय बघ ना
पणतितलं विश्व सुनं-सुनंच असतं.....

अंधाराने व्यापलेल्या भग्न देवळा सारखं....
ओसाड रानावरच्या विझलेल्या पणतिसारखं....

तुझं-मझं नातं...........
कापसाची वात आणि पणतितल्या तेला सरखं.....