Thursday, July 25, 2013

पहिला पाऊस आणि ती

पहिला पाऊस आणि ती
आठवणी घेऊन जुन्या
येरे तू पावसा ,
तिला पाहण्यासाठी
जीव जाला वेडा पिसा...!!!

थंड हवा आणि ढगाळ वातावरण
हे आहेत तुझा येण्याची लक्षण,
थंड हवा म्हणजे अंगावर शहारा
आणि वातावरण जसे मनावर दडपण...!!!

जसे जसे ढग जवळ येऊ लागतात
अचानक पोटात गोळा येतो,
कारण मनाला ते ढग बरसावे तर वाटतात
पण ढगांचा दुरवा नको वाटतो...!!!

आकाश आता पूर्ण काळे जाले
कोणत्याही क्षणी ते बरसतील,
आठवणीने डोळ्यात केलेले
घर ते नकीच वाहून नेतील...!!!

पहिला थेंब गालाला स्पर्श करताच
अंगात आनंदाची लाट दरवळत असे,
तो स्पर्श नेहमीच
तिचा नाजूक बोटांची आठवण देत असे...!!!

आजकाल लोकांना म्हणे पाऊस आवडत नाही
म्हणतात भिजायला आवडत नाही,
त्यांना काय माहित छत्री असूनही
तिचा बरोबर भिजण्याचा आनंद कशातही नाही...!!!

हळू हळू आवाज व्हाडू लागतो
म्हणे पाऊस जोर धरतोय ,
तो तर तिचा दरवाजा आपटत असतो
सांगायला तुजी कोणी आठवण काढतोय...!!!

काही क्षणात वातावरण
शांत होते,
जाताना मनातल्या आठवणींचा रोपाला
पाणी देऊन जाते...!!!

पहिला पाऊस नेहमी
मातीचा सुगंद घेऊन येतो,
त्याच बरोबर जाताना
काही जुन्या आठवणी जाग्या करून जातो...!!!

No comments:

Post a Comment