Friday, May 28, 2010

मन आणि बुद्धी

मन आणि बुद्धी
एकाच आईची दोन मुलं
नाते सख्ख्या भावंडचे
पण वागणे मात्र सावत्रपणाचे

एकाने भावना जपायच्या
तर दुसर्‍याने तार्किकता
एकाने अलगद वाहवत जायचे
तर दुसर्‍याने कर्तव्य-कठोर व्हायचे |१

एकाने हळुवार प्रेमाच्या
गोड स्वप्नात रमायचे
तर दुसर्‍याने वास्तवाच्या
चिमट्यांनी जागे करायचे |२

एकाने वार्‍यासारखे
सतत चंचल वागायचे
तर दुसर्‍याने मेरूपर्वतासारखे
अढळ रहायचे |३

‘एकमेकांवर नित्य कुरघोडी’
दोघांचा हा विचित्र स्वभाव
स्वत:ची श्रेष्ठता जपण्याचा
निरर्थक असा अहंभाव |४

यांच्या या झगड्यात
आपणच भरडले जातो नेहमी
तरीही नाही ठरवू शकत
बुद्धी महान की मन हुकमी |५

भावनेचे सामर्थ्य मनाचे
तर निर्णयक्षमता बुद्धिची
एवढेच समजतं माझ्या सरळ-साध्या बुद्धिला
आणि भोळ्याभाबड्या मनाला….. |६

Wednesday, May 26, 2010

माझ्यावरील रूसवा सोडून माझ्या जवळीच येना

माझ्यावरील रूसवा सोडून माझ्या जवळीच येना
माझ्या मनातल्या चांदण्यांना तुझ्या ओंजळीत घेना
माझ्यावरील रूसवा सोडून माझ्या जवळीच येना

झाल्या असतील अक्शम्य चुका माझ्याकडून

पण प्रेमात वाटेवर चालताना होतात ह्या चूकून
माझ्या ह्या वेडेपणाला तु मला माफ़ तरी करना
माझ्यावरील रूसवा सोडून माझ्या जवळीच येना

तु जवळ असता वाटे जग स्वर्ग हे सारे

माझ्यापासून दूर व्हावे आणि स्मशान झाले सारे
माझ्या त्या मुर्ख वागण्यास विसरून तरी जाना
माझ्यावरील रूसवा सोडून माझ्या जवळीच येना

एकटाच पाहतो आहे तो सुंदर किनारा

तुझ्याविना वाटे तो सुंन्न किनारा
तुझ्या मनातील वादळाला शांत तरी करना
माझ्यावरील रूसवा सोडून माझ्या जवळीच येना

प्रेमकथां

सगळ्या प्रेमकथांची सुरुवातगोड बोलण्यानंच होते 
सगळ्या प्रेमकथांची अखेरमटार सोलण्यानंच होते!

दोन फुलं

फरकप्रत्येक अशा जिवीत फुलाला,
फांदीपासून दुर व्हावं लागतं ।
मोहक अशा पुष्पहारांत,

रांगेत जाऊन बसावं लागतं ।
एकाच झाडाची दोन फुलं,

वेगवेगळ्या माळेत विणली होती ।
एक गेला देवाच्या गळ्यात,

अन दुसऱ्याची माळमयतासाठी आणली होती ।mAdHuRi. .... ???

अपुर्णच राहिल

माझ प्रेम कधी कलाल नाही तुला,
म्हनुनच कायमचा सोडून गेलास मला,
मी वेड्यासारखी प्रेम करत राहिले तुझ्यावर,
आणि तुही जिवापाड प्रेम केलास माझ्यावर,
पण का का कधी विचारल नाहीस मला,
माझ्या नकाराची भिती होती का तुला?
तुझ माझ प्रेम हे दोघांच्या मनात फुलत राहिल
दोघान्चाही एकमेकांवर प्रेम असुनही अपुर्णच राहिल,
आणि आता ते कायमच राहिल अपुर्णचकारण तुझ्याशिवाय मी पण अपुर्णच
माधुरी . ....

Pratiksha. ....

शेवटी इच्छा माझ्या मनाची
खरचं पूर्ण करशील ...???
का नाही मिळालास या जन्मी
तरी पुढल्या जन्मी तरी मिळशील का . .... ???
Pratiksha. ....

Monday, May 24, 2010

वेगळाच आहे पाऊस आज

वेगळाच आहे पाऊस आज, हे आकाशही वेगळेच आहे.
गर्दी करुन दाटलेल्या ढगांचा
इरादाच काय वेगळा आहे!
आकाशात उत्साह रंगवणार्या ढगांनी
आज मात्र उत्पात मांडला आहे.
हा पाऊस आज जरा वेगळाच आहे.

ढगांतून बरसणारे हे थेंबसुद्धा
गनिमी कावा करीत आहे
नेहमी ओल्याचिंब करणार्या सरीं
आज कोरडाच स्पर्श करीत आहे.

आकाशात चमकणारी पांढरी पाती
आज काळजांत घुसली आहे.
नेहमी ढगांतून वार करणारी वीज
आज छातीतच कडाडली आहे.

उन्हात तळपलेल्या जमिनीतून
धूळीचा लाल ढग उठला आहे
ओल्या मातीचा दरवळणारा सुगंध
आज प्रत्येक श्वासात खवळला आहे.
वेगळाच आहे पाऊस आज, हे आकाशही वेगळेच आहे.

Wednesday, May 19, 2010

आठवणींचे जग

आठवणींचे जग किती अनोखं
गुंतलो एकदा की खरं जग पारखं

सापडतो कधी सानपणचा चॉकलेटचा बंगला
गावाच्या मध्यभागी असणारा अमुचा इवलसा इमला

डोळ्यांपुढे सरकते मास्तरांची छडी
मित्रांसोबत चोरुन पेरु खाण्यातली गोडी

भेटतात आईवडिलांगत प्रेम करणारे शिक्षक
टिळकांच्या भूमिकेसाठी कौतुक करणारे प्रेक्षक

ऎन मध्यान्ही रंगलेला क्रिकेटचा डाव
टुर्नामेन्ट जिंकताना घेतलेली विजयी धाव

पहिला नंबर आल्यावर मिळालेलं बक्षिस
दीड मार्क कापले म्हणून मास्तर वाटायचे खवीस

उशीरा उठलो म्हणून मिळायचा धम्मकलाडू
बॅटसाठी हट्ट करताना फ़ुटलेलं खोटं रडू

कधी दिसतं आजीच्या हातचं थालिपिठ
मुंजीच्या वेळेस आईनं कौतुकानं लावलेली तीट

अचानक ओळख दाखवतात दडलेल्या स्म्रुती
मनात जतन करुन ठेवलेले क्षण तरी किती

असे माझे दिवास्वप्न कितीदा भंगती
मॅनेजर अचानक उभा असे संगती
नाईलाजाने coding साठी पुन्हा हात सरसावतात
आयुष्याची debugging उद्या पुन्हा करू असं मनाला समजावतात!!

जीवन म्हनजे एक हसर गाण असत


जीवन म्हनजे एक हसर गाण असत
असली वाट काटेरी तरिहि मन्सोक्त हुन्दडायच असत

करावी निसर्गाशी दोस्ति
बेधुन्द वार्यासन्गे मनमुराद मस्ती
पहिला पाऊस जणू अम्रुतच असत

जीवन म्हनजे एक हसर गाण असत
असली वाट काटेरी तरिहि मन्सोक्त हुन्दडायच असत

घ्यावा दिव्याचा आदर्श
ईतरान्साठि करावा निकराचा सन्घर्श
दुस्र्यान्च्या समधानातच खर सुख असत

जीवन म्हनजे एक हसर गाण असत
असली वाट काटेरी तरिहि मन्सोक्त हुन्दडायच असत

कडु-गोड आठवनिन्ची घेऊन शिदोरि पाठि
हाति असावि सदा आपल्या आत्मविश्वासाचि काठि
प्रत्येक प्रसन्गाला धेर्याने सामोर जायच असत

जीवन म्हनजे एक हसर गाण असत
असली वाट काटेरी तरिहि मन्सोक्त हुन्दडायच असत

Friday, May 14, 2010

मैत्री…..!

मैत्री असावी एक वेगळं आयुष्य घडवणारी,
मैत्रीच्या खुणा आठवणीत बांधणारी..
मनांच्या भिंतींना मैत्रीचे दार पाडून,
एक प्रेमळ मित्रासाठी आर्त हाक देणारी…

कधी शिकवण कधी आठवण,
तहानलेल्या चातकाला जशी पावसाची वणवण…
आपल्या मैत्रीचे दिवस पंखाखाली घेत,
प्रेमाचे मृगजळ शोधतेयं माझे हे जीवन..
तरीही या जीवनात सुखाचा आसमंत फुलवनारी,
मैत्री असावी एक वेगळं आयुष्य घडवणारी………

माझ्या या आयुष्यात तुझ्या मैत्रीचा सहारा,
मैत्रीच्या नात्याला तुझ्या आठवणींचा दुजोरा..
दुःखाच्या चिंब पावसात शोधतोय,
सुखाची उब देणारा तुझ्या मैत्रीचा निवारा…
सकाळच्या सुर्यासोबत इंद्रधनू घेऊन येणारी….
मैत्री असावी एक वेगळं आयुष्य घडवणारी…..

कोऱ्य़ा माझ्या आयुष्यात मैत्रीचे चित्र तू चितारले,
प्रेमाच्या सप्तरंगात ते चित्रही नाहून निघाले…
पाणावलेल्या डोळ्यांनी आज पुन्हा त्याकडे बघतोय,
तुझ्या आठवणीचा एक रंग त्यात शोधतोय..
जीवनाच्या चित्रपटलावर वेगळेचं रंग रंगवणारी….
मैत्री असावी एक वेगळं आयुष्य घडवणारी…...

Wednesday, May 12, 2010

आयुष्य

By: Shahu Garade

कधी कोणी समजू शकतो का या मुलींना?

कधी कोणी समजू
शकतो का या मुलींना?
समजून सगळे
नासमज बनतात मुली
चांगल्या चांगल्या मुलांना
वेडयात काढतात या मुली
अनोलखी पुरुषाला
दादा - भैय्या म्हणतात या मुली ,
पण आपल्याच वडलान्ना
काका का म्हणतात या मुली ,
बोलायला गेलो तर
लाइन मारतोय म्हणतात या मुली,
मग नाहीच बोललो की
शाइन मारतोय का म्हणतात या मुली?
मुद्द्याच बोलण थोड़च असत
तरी चिव चिव चिव चिव खुप करतात या मुली,
जेव्हा खरज बोलण्याची गरज असते ....
तेव्हा नजर खाली करून रुमाल का ख़राब करतात या मुली ?
पावसात भिजायच तर असत
तरी चिखल पाहून नाक का मुरडतात मुली ?
थंडी गुलाबीच चांगली अस म्हणतात!!!
मग 2-4 स्वेटर घालून सुद्धा कुडकुडतात का या मुली ??
वाचून ही कविता
चान्ग्ल्याच भडकतिल या मुली !!!!!
मग (कदाचित) विचार करून मनात...
थोड़ तरी बरोबर आहे महणतील या मुली

Tuesday, May 11, 2010

असाव कुणीतरी..

असाव कुणीतरी…..तुज़्यामधे मी हरवले म्हननारी…..
असाव कुणीतरी…..तुज़्यामधे मी हरवले म्हननारी…..
असाव कुणीतरी…..
सकाळी साखरझोपेतुन उठवणारी,
आणी तो चेहरा बघुन माजी क्षणात झोप उडावी….
असाव कुणीतरी…..
प्रेमाने सकाळी चहा करून देणारी ,
आणी केविल्वान्य डोळ्यानी माज़कडे पाहत राहणारी…..
असाव कुणीतरी…..
मी जवळ नसताना माज्या सोबत घालवलेल्या,
प्रतेक क्षणाची आठवण काढत राहणारी…..
असाव कुणीतरी…..
माजा वेडेपना पाहून गालातल्या गालात हसणारं,
आणी शब्दांना कानात साठवुन गोड प्रतिसाद देणारी…..
असाव कुणीतरी…..
भरलेच जर डोळे कधी माजे,
तर ओल्या असवांना पुसनारी…..
असाव कुणीतरी…..
माज्या मनात रमनारी,
अंधारलेल्या वाटेत माज्याबरोबर येणारी…..
असाव कुणीतरी…..
पलिकडील किना-यावरून माजी वाट पाहणारी,
उशीर जाला म्हणुन उदास आणी बेचैन होणारी ……
असाव कुणीतरी…..
असाव कुणीतरी…..तुज़्यामधे मी हरवले म्हननारी…

प्रेम

प्रेमात पडणं सोपं असतं
पण प्रेम निभवणं कठीण असतं,
हातात हात घेऊन चालणं सोपं असतं
पण तोच हात आयुष्यभर हातात घेऊन पाऊलवाट शोधणं कठीण असतं...

Monday, May 10, 2010

आठवणी

"ओसरून जाता सर तुझी दूर निघून जाशील, ओल्याचिंब तुझ्या आठवणी मागे ठेऊन जाशील, जेंव्हा जेंव्हा आठवेल तुझी दुरावलेली सर, आठवणींचा पाऊस येईल भिजवून जाईल घर...".

आठवणींचा पाऊस

ओसरून जाता सर तुझी दूर निघून जाशील, 
ओल्याचिंब तुझ्या आठवणी मागे ठेऊन जाशील, 
जेंव्हा जेंव्हा आठवेल तुझी दुरावलेली सर, 
आठवणींचा पाऊस येईल भिजवून जाईल घर..

फक्त तुझ्यासाठी ..!

आयुष्याचा प्रत्येक क्षण तुझ्यासोबत चालत होतो
आणि आज नजरेआड होताना तुलाच पाहत होतो
भावनांचा कल्लोळ मनातून वाहत होतो
वेदनांचे वादळ क्षण क्षण झेलत होतो

भरभरून दिलेस तूच आणि रिक्तही केलेस तूच
सुख देता देता दुःखच फक्त दिलेस तू
अश्रूंचे जळ मी माझ्याच ओंजळीने पीत होतो
तरीही फक्त तुझ्यासाठी सर्व सहन करीत होतो

सुखाची तुझ्या भाषाच निराळी होती
पण माझ्या सुखाची तार तूझ्याशी जुळली होती
मनाचा कोंडमारा सहन करीत जगासाठी हसत होतो
आणि एकांतात फक्त तुझ्यासाठी रडत होतो

माझं प्रेम...

अळवाच्या पानावरचं पाणी होतं माझं प्रेम
करत असूनही सांगता येत नव्हतं माझं प्रेम
भावनेच्या ओघात वाहत चाललं होतं माझं प्रेम
आठवानींच्या सागरात बुडत चाललं होतं माझं प्रेम
पावसांच्या सरीत चिंब न्हालं होतं माझं प्रेम
थंडीच्या गारव्यात गारठलं होतं माझं प्रेम
तिच्या एकेका भेटीसाठी आसुसलं होतं माझं प्रेम
गप्पा तिच्याशी मारताना रंगून जात होतं माझं प्रेम

मनात कुठेतरी खोलवर दडलं होतं माझं प्रेम
कललच नाही मला कसं जडलं माझं प्रेम
वाटल होतं सांगुन टाकावं तिला माझं प्रेम
तिच्या मनाला पटेल असं समजवावं माझं प्रेम
सर्वांनी सांगितलं एकतर्फी प्रेम म्हणजे माझं प्रेम

सांगितल्याविना तिला झुरतं राहिलं होतं माझं प्रेम
मनातल्या मनात कुठवर लपवून ठेवावं माझं प्रेम
माझ्याच मनात द्वंद्व निर्माण करत माझं प्रेम
होकार-नकाराच्या वादलात सापडलं होतं माझं प्रेम
निश्चय केलाच तिला सांगाव माझं प्रेम

वर्षे गेली... सांगायची तयारी करायला माझं प्रेम
शोधून मुहूर्तं सापडला, तिला सांगायला माझं प्रेम
गाठलं रस्त्यातचं तिला, एकदा सांगायला माझं प्रेम
थांबवलं तिनेच मला, सांगण्यापुर्वीच माझं प्रेम
हातातली पत्रिका पाहून गोथालं तिथेच माझं प्रेम
सहकुटुम्ब, सहपरिवार लग्नाल अगत्य यायचं सांगुन गेलं माझं प्रेम

Friday, May 7, 2010

आई करशील ना माफ ....

आई करशील ना माफ ....
'काय आई
तू कशी आहेस ?’
कधी मी विचारलंच नाही.
तिर्थक्षेत्र ..
.. माझ्या घरातलं
कधी मी पाहिलंच नाही.

घर शुद्ध करणारी गंगा ..
पदतीर्थ या गंगेचं ..
कधी मी घेतलं का ?

माझ्यासाठी झिजणारं चंदन ..
रोज कपाळी ..
कधी मी लावलं का ?

तिनंच तर शिकवलं सगळं
पण तिचं शिष्यत्त्व
कधी मी मानलं का ?

आमची आनंददात्री,
दु:ख तिचं
कधी मी जाणलंच नाही

आतापर्यंतच जगणं
.. छे
खरतरं ते जगणंच नाही ...