Thursday, November 25, 2010

मी विचारही केला नव्हता की ...

मी विचारही केला नव्हता की असे काही घडेल,
सर्वकाही विसरून, मी तिच्यावर प्रेम करेल,
तो काळच तसा होता, ती वेळच तशी होती,
ह प्रसंग आहे तेव्हाचा, जेव्हा ‘ती’ माझी नव्हती,

ध्येय नव्हते जीवनाला, कुठला ध्यासही नव्हता,

नव्हती चिंता उद्याची, स्वतःवर विश्वासही नव्हता,
अशातच जेव्हा मी पहिल्यांदा तिला पाहिले,
विद्युत् वेगाने माझे काळीज धडधड्ले,

तिचं लाजन, तिचं हासन, आणि बोलके डोळे,

काळजाच्या कप्प्यात साठवले सगळे,
मग तिची आठवण होताच मला पड़े भ्रांत,
बोलायचे म्हटले तर, तिचा स्वाभाव शांत,

काय कराव तेच कळत नव्हते,

कसही करून तिचे मन जिंकायचे होते,
हिम्मत करून शेवटी तिला प्रेमपत्र लिहिले,
विचार करण्यास मुदत म्हणुन काही दिवस दिले,

महिना होउन सुद्धा तिचा होकर नाही आला,

होकाराच्या प्रतिक्षेत माझा जिव व्याकुळ झाला,
समजुन चुकले मी, हा नक्कीच तिचा नकार आहे,
तिला विसरने हाच एकमात्र उपाय आहे,

शेवटी करायला नको ते धाडस मी केले,

होकर आहे की नकार थेट तिलाच विचारले,
मग माझे पत्र दाखवत ती म्हणाली, हे काय आहे..?,
‘तुझ्या एव्हडेच माझे तुझ्यावर्ती प्रेम आहे,

एकून तिचे उत्तर, ‘मन’ बेभान होउन नाचले,

अतिआनंदाने डोळ्यात पानी साचले,
ध्येय मिळाले जीवनाला, ध्यासही गावला,
माझ्यावरचा विश्वास मी तिच्या डोळ्यात पहिला,

आता दीवसही माझा तिच्या नावाने उगतो,

स्वप्नातला चंद्रही तिच्यासाठी झुरतो,
रक्तासारखी माझ्यात ती सामावली सर्वांगी,
साधी, भोळी, अल्लड माझी प्रेयसी...

असं प्रेम करावं ...

असं प्रेम करावं

थोडं सांगावं थोडं लपवावं,
असं प्रेम करावं

थोडं रुसावं थोडं हसावं,
असं प्रेम करावं

गुपचुप फोन वर बोलावं,
कोणाची नाज़र पडताच पटकन "अरे" चा "अगं" करावं
असं प्रेम करावं


जग पुढे चाललं असलं
तरी आपण मात्र थोडं मागेचं रहावं,
फोन, SMS, आणि E-MAILS च्या जगात ही,
आपण मात्र पत्र लिहुन मांडावं,
असं प्रेम करावं

कुठे भेटायला बोलवावं,
पण आपण मात्र उशिरा जावं
मग आपणच जाऊन sorry म्हणावं,
असं प्रेम करावं

वर वर तिच्या भोळसट पनाची,
खूप चेष्टा करावी,
पण तरीही ती तुम्हाला किती आवडते, हे जरूर सांगावं,
असं प्रेम करावं

प्रेम ही एक सुंदर भावना,
हे ज़रूर जाणावं,
पुन त्या बरोबर येणार्‍या वेदनांना ही सामोरं जावं
असं प्रेम करावं

विरह येतील, संकट ओढवतील,
प्रेमाच्या अनेक परीक्षा होतील,
पण आपण मात्र खंबीर रहावं,
असं प्रेम करावं

एकदाच होतं, नशिबवानानाचं मिळतं,
म्हणूनच जीवापाड जपावं,
असं प्रेम करावं ... असं प्रेम करावं ...

आयुष्याच्या या गर्दित हात माझा धरशील का?

तुझे प्रत्येक दुखः मला देऊन
सुखात माझ्या येशील का?
आयुष्याच्या या गर्दित हात माझा धरशील का?

एकांत भासेल जेव्हा तुला
बोलावून मला घेशील का?
थरथरनारया तुझ्या श्वासाने
ह्रदय माझे जपशील का?
आयुष्याच्या या गर्दित हात माझा धरशील का?

तुझ्या हृदयातील प्रत्येक गोष्ट
तुझ्या कोवळया ओठांवर आणशील का?
प्रत्येक वेळेस डोळ्यातून बोलण्याएवजी
आता तरी हो म्हणशील का?
आयुष्याच्या या गर्दित हात माझा धरशील का?

स्वप्नातल्या राजकुमार बरोबर
रील्पेस मला करशील का?
आणी ह्या वेडयाच्या आयुष्यात
स्वप्नपरी म्हणून अवतरशील का?
आयुष्याच्या या गर्दित हात माझा धरशील का?

Friday, October 15, 2010

स्वप्न आणि सत्य

एकदा स्वप्न आणि सत्य यांचे जोरदार भांडण झाले.
विषय होता भविष्य घडविण्यात सर्वाधिक सहभाग कोणाचा. 
दोघे ही खुप भांडले, झगडले पण निर्णय काही होईना. 
शेवटी या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी ते आपल्या मानसपित्याकडे- ब्र्म्हदेवाकडे गेले. ब्र्म्हदेवाने त्यांना सांगितले, "ज्या कोणाचे हात आभाळाला टेकतील आणि तरीही ज्याचे पाय जमिनीवर आसतील, त्याचा भविष्या घडविण्यात निर्णायक सहभाग असतो".


दोघेही परत आले. स्वप्नाने आधी प्रयत्न केला.
 एकच उडीत त्याचे हात आभाळाला टेकले, पण त्याचे पाय जमिनीपसुन केंव्हाच उचलले गेले होते. 
सत्याने नंतर प्रयत्न केला. त्याचे पाय कायम जमिनीवर होते, पण त्याचे हात आभाळापर्यंत कधीच पोचु शकले नाहीत. 


दोघांनीही खुप प्रयत्न केले, पण दोघांपैकी कोणीच यशस्वी होउ शकले नाही. 
थकुन परत एकदा ते ब्रम्हदेवाकडे गेले, आणि या वेळेस ब्रम्हदेवाने त्यांना सांगितले, "भविष्य घडविण्यात सत्य, आणि स्वप्न या दोघांचाही सहभाग तितकाच मोलाचा असअतो. 
खर्‍या अर्थाने यशस्वी भविष्य घडवायचे असेल, तर स्वप्नाला सत्याच्या खांद्यावर उभे रहयला हवे!."

प्रेम आणी computer वेड

वर्गात नेहमी खुन्नस देता देता
दिलीस एकदा सुन्दर smile
उघडशील का माझ्या "pritee"ची
एक एक Backup File.

जेव्हा तुला पहातो तेव्हा
hang होते माझी hard Disk
माझी OS ही सांगते मला
घेतली आहेस मोठी Risk.

Risk Management क़ेलेय मी
Estimate ही काढला आहे.
थोडे Reengineering करावे लागेल
तुझा माझा समेट एवढा एकच पर्याय आहे.

फक्त एकदाच पहायचे आहे
तुझ्या ह्रुदयात Login करुन
Delete करायचेत सगळे Folder
फक्त माझ्या नावाचा Folder राखुन.

Antivirus बनेन तुझ्यासाठी
वाचवेन तुला Spam पासुन
एकच mail कर माझ्या mailवर
वाट बघतोय कधीपासुन.

म्हणणे फक्त एवढेच आहे
आशा करतो तुझी इच्छा ही असावी
कोणी visit द्यायचे म्हटले
तर तुझी माझी URL एकच असावी...

घरापासून दूर

मी घरी कीतीही दिवसभर दंगा केला
तरी मला आई थोपताल्याशिवय कधीच झोपली नाही
घरापासून दूर म्हणुनच आता कदाचित
शांत झोप कधी लागलीच नाही.

कुणी वीचारते "तुला घरी जाऊस वाटत नाही"?
कसा सांगू त्यांना घरातून निघताना
आईला मारलेली मीठी सोडवत नाही.

आई तू सांगायची गरज नाही
तुला माझी आठवण येते
आता माझ्यासाठी डब्बा करायचा नसतो
तरीही तू सहा वाजताच उठतेस.

तुझ्या हातचा चहा तुझ्या हातची पोली
तुझ्या हातची माझी न आवडती भाजी खायला
आजही जीभ आसुसली.

घरापासून दूर .......
आई जग खुप वेगले आहे
तुझ्या सावलीत अगदी बिनधास्त होतो
आता रानागानत उन आहे

तू आपल्या पील्लान साठी
सगला केलस एक दीवस पिल्लं म्हणाली
आई आता आम्हाला जायचय
आंनी तू त्यांना जाऊ दीलस
आई तू इथे नाहीस
बाकी माझ्याकडे सगळे आहे
घरापासून दूर
जग खुप वेगले आहे.

ऐक कविता


Thursday, September 16, 2010

मरणाचा अर्ज...

यमाच्या ऑफिसात
मरणाचा अर्ज केला
"रिसन फॉर डाइंग" म्हणून
त्यांनी फॉर्म भरायला दिला
पहिला टेक्नीकल राउंड झाला
डोळे रोखून तो मला म्हणाला
so Mr. why should we choose YOU for death?
मी पूर्ण कहाणी सांगीतली
त्यालाही ती होती पटली
मग Hr शी डिसकशन झाल
तिने मला expectation विचारल
मी म्हणालो तात्काळ मरण चालल
ती म्हणाली "is it negotiable?"
मग अपघात फायनल ठरला
वेळेवर ठरल्याप्रमाने घडला
पण चार दिवसानंतर माझा
हॉस्पिटल मध्ये डोळा उघडला
मी लगेच यमलोकात फोन केला
म्हणालो मी अपघातात वाचलो
मग आता करणार का माझा खून?
यमलोकातली HR बोलली
"we will get back to you soon...."

Wednesday, August 25, 2010

हेच तर प्रेम असतं. . .




















बाप्पा

परवा भेटला बाप्पा, जरा वैतागलेला वाटला
दोन क्षण दम खातो म्हणून माझ्या घरी टेकला
उंदीर कुठे पार्क करू? लॉट नाही सापडला
मी म्हंटलं सोडून दे, आराम करू दे त्याला
तू पण ना देवा, कुठल्या जगात राहतोस?
मर्सिडिसच्या जमान्यात उंदरावरून फिरतोस
 
मर्सिडिस नाही निदान नॅनो तरी घेऊन टाक
तमाम देव मंडळींमधे भाव खाऊन टाक
इतक्या मागण्या पुरवताना जीव माझा जातो
भक्तांना खूष करेपर्यंत माझा जीव दमतो
काय करू आता सारं मॅनेज होत नाही
पूर्वीसारखी थोडक्यात माणसं खूषही होत नाहीत
 
इमिग्रेशनच्या रिक्वेस्ट्सने सिस्टिम झालीय हँग
तरीदेखील संपत नाही भक्तांची रांग
चारआठ आणे मोदक देऊन काय काय मागतात
माझ्याकडच्या फाइल्स नुसत्या वाढतच जातात
माझं ऐक तू, कर थोडं थोडं डेलिगेशन
मॅनेजमेंटच्या थिअरीमधे मिळेल सोल्यूशन
एमबीएचे फंडे तू शिकला नाहीस का रे?
डेलिगेशन ऑफ ऑथॉरिटी ऐकलं नाहीस का रे?
 
असं कर बाप्पा एक लॅपटॉप घेउन टाक
तुझ्या सार्या दूतांना कनेक्टिव्हिटी देऊन टाक
म्हणजे बसल्याजागी काम होईल धावपळ नको
परत येऊन मला दमलो म्हणायला नको
माझ्या सार्या युक्त्यांनी बाप्पा झाला खूष
माग म्हणाला हवं ते, एक वर देतो बक्षीस
सीईओची पोझिशन, टाऊनहाऊसची ओनरशिप
इमिग्रेशनदेखील होईल लवकर मग ड्युअल सिटिझनशिप
 
मी हसलो उगाच, म्हंटलं, देशील ते मला हवं
म्हणाला मागून तर बघ, बोल तुला काय हवं?
पारिजातकाच्या सड्यात हरवलेलं अंगण हवं'
सोडून जाता येणार नाही अस एक बंधन हवं
हवा आहे परत माणसातला हरवलेला भाव
प्रत्येकाच्या मनाच्या कोपर्यात थोडासा शिरकाव
देशील आणून परत माझी हरवलेली नाती
नेशील मला परत जिथे आहे माझी माती
इंग्रजाळलेल्या पोरांना थोडं संस्कृतीचं लेणं
आईबापाचं कधीही न फिटणारं देणं
कर्कश्श वाटला तरी हवा आहे ढोलताशांचा गजर
भांडणारा असला तरी चालेल पण हवा आहे शेजार
यंत्रवत होत चाललेल्या मानवाला थोडं आयुष्याचं भान
देशील का रे बाप्पा माझ्या पदरात एवढं दान?
 
तथास्तु म्हणाला नाही, सोंडेमागून नुसता हसला
सारं हाताबाहेर गेलंय पोरा, सुखी रहा म्हणाला

Saturday, August 21, 2010

जिवलग मित्र

हाच तर जिवलग मित्र असतो...
कोल्ड ड्रिंक मधे दारू मिसळवतो
टाईट झाल्यावर उशिरा रात्री घरी सुखरूप सोडतो
१ दिवस फोन नहीं केला तर रागवतो
फोन केला तरीही शिव्या घालतो
समोरून एखादी फाकडू पोरगी जात असेल तर
तिच्या समोर मस्त पोपट करतो
कॉलेज ला आल्यावर पहिला कॉल आपल्याला करतो
कुठे आहेस म्हणुन विचारतो
पिकनिक ला जाताना
आई बाबांना हाच तर मस्का लावायला कामी येतो
बाइक वरून पडलो की सगळे हसत असताना
धावत येउन उचलतो
आपण विसरलो तरीही
वाढदिवशी १२ वाजता बरोबर मेसेज करतो
परिक्षेच्या वेळी
सुपरवायज़रला घाल चुलीत म्हणुन सप्प्लिमेंट हातात देतो
काही चुकले तर ओरडतो
गरज असेल तर कान पीळतो
इतर मित्रांच्या तुलनेत
आपली जास्त काळजी घेत असतो
हाच असतो जो
आपल्या कली रूपी आयुष्याला फुलवत नेत असतो
हाच असतो जो
आपल्या कृष्ण-धवल आयुष्यात रंगांची उधलन करत असतो
दुखात असताना.. जवळ येउन काय झाल..? म्हणुन विचारतो
आपण नजर खाली करून काही नाही म्हणुन त्याला टाळतो
आपल्या डोळ्यात बघून
काय रे एवढा परका झालो का..? असा उलट प्रश्न करतो
सुखात हक्काने पार्टी मागणारा
आणि दुखात रडायला खांदा देणारा हाच तर जिवलग मित्र

काँलेज म्हणजे तरुणाइ

काँलेज म्हणजे तरुणाइचं
गाव असत...
प्रत्येक तरुणांच्या मनात
कोरलेलं एक नाव असत...

हेच गाव कधीतरी
जाग होत..
आठवणीँच्या हिदोँळ्यावर
झेपु पाहत..

काँलेजच्या कट्यावरुन रोज
हिरवळ जायची..
ती पाहण्यासाठी पोरांची
चंगळ मग उडायची..

लायब्ररीमध्ये अभ्यास करायची
फक्त एक ट्रीक होती..
शांततेत नजर मिळवीण्याची ती
एक टेकनीक होती..

Phy. चे सर शिकवायचे
Law न्युटनचे..
इकडे मुलांचे
खेळ.., फुल्ली गोट्यांचे...!

केमिट्रीच्या प्राकटीकलला
मुलीँचाच Basis...
कोण करतय मग
Qualitative analesis...!

I.T शिकवायला एक
मिस होती..
सर म्हणायचे आमच्या
काँलेजमध्ये तीच एक पिस होती..

ENG. च्या मँडमची होती
वेगळीच अदा..
आणि PHY. शिक्षक तीच्या
भुगोलावर फिदा...

वर्गात असली 40 कार्टी
तरी हजेरी 80 ची लागयची..
मित्रांची मित्रता यातुनच
तर दिसुन यायची..!

EXAM hall l ची सेटिँग
आम्हीच करायचो..
त्यातुनच तर मार्काँची,
बेरीज आम्ही करायचो...

काँलेच्या आठवणिँना
शब्द अपुरे पडतात..
पण त्याच आठवणीँनी
आता.., डोळे मात्र पाणवतात...!

कॉलेज

कॉलेज
Syllybus जरा जास्तच आहे
दर वर्षी वाटतो...
Chapters पाहून Passing चा
Problem मनात दाटतो...

तरी lectures चालू राहतात
डोक्यात काही घुसत नहीं....
चित्र-विचित्र figures शिवाय
Board वर काहीच दिसत नाही....

तितक्यात कुठून तरी Function ची
Date जवळ येते...
Sem मधले काही दिवस
नकळत चोरून नेते...

नंतर lecturers Extra घेउन
भरभरा शिकवत राहतात...
Problems Example Theory सांगून
Syllybus लवकर संपवू पाहतात...

पुन्हा हात चालू लागतात...
मन चालत नाही....
सरांशिवाय वर्गामध्ये
कुणीच बोलत नाही...

Lectures संपून Submission चा
सुरु होतो पुन्हा खेळ..
journal Complete करण्यामध्ये
फार फार जातो वेळ...

चक्क डोळ्यांसमोर Syllybus
चुटकी सरशी sampun जातो..
'PL's मध्ये वाचून सुद्धा
Paper काबर सो...सो..च जातो?????

Wednesday, August 11, 2010

dedicated to someone very special....
माझं स्वप्न . ....


मी पाहिलेलं न माझ्या मनाला आवडलेलं
माझं एक स्वप्न आहे
तू जीवनात यशस्वी व्हावास आणि
तुझ्या यशात माझं यश सामावून घ्यावस

तुझ्या त्या यशाला
सीमा कुठल्याच नसतील
कारण,
तुझ्या आधी जाऊन
मी त्या पुसल्या असतील

प्रयत्न करताना
तू कधीतरी थकशील
पण कंटाळा हि विसरशील
कारण,
दुःखाचे घाट मी पेलीन
आणि तुझ्या वाटेत
सुखाच्या पायघड्या अंथरीन

माझ्या मूळे यशाकडे
तू कधी दुर्लक्ष केलास
तर
तुझ्या जीवनातून
आपोआप बाजूला होईन
आणि तुझा मार्ग सुकर करीन


कारण
आयुष्यात एकाच स्वप्न आहे
तू यशस्वी व्हावस
आणि तुझ्या यशात
माझं यश सामावून घ्यावस.


- माधुरी पाटील

Monday, August 9, 2010

भरल्या नयनांना सावरल हातानं
दाटल्या ह्रदयाला शांत केल ओठान
तुझ्या आठवणीना मानवलं मनानं
जीवन प्रवाहाला विचारण शमवल
तुझ्या प्रेमळ नजरेन मला फसवल

-माधुरी पाटील
विधिलिखित . ....
पाण्यांनी गच्च ओथांबलेले ढग माझ्याही झोपडीवर कधी जमा झाले होते ,
पण अगदी अनपेक्षित वाऱ्याचा झोका आला ,अन.. ते ढग माझ्या शेजारच्या काट्यांवर बरसले
त्या काट्यांना हि आता बहार आलाय ,टोचून टोचून तर त्यांनी कहर केलाय पण....?
माझा रोष त्या काट्यांवर नाही... काटे शेवटी बोचनारच...
माझा रोष त्या वाऱ्यावर हि नाही वारे शेवटी वाहणारच
रोष माझा नशिबावर आहे
पण..............
विधिलिखित अखेरीस घडणारच. ... .

- माधुरी पाटील