Tuesday, June 25, 2013

काहीच कसं वाटत नव्हतं ...

तेव्हा तुझ्या जीवाला काहीच कसं वाटत नह्व्त..
आपल्या पहिल्या भेटीत एक नातं जडलं होतं
आता मला माहित नाही पण तेव्हा तुला माझ्या बद्दल काहीतरी वाटतं होतं
मी ही म्हणून धाडस केलंहोतं
आज तेच नातं तोडताना तुझ्या डोळ्यात साधं पाणी ही न्हवत...

आपल्या प्रत्येक भेटीत आपण एक नवीन स्वप्नांचं घर बांधलं होतं,
आज तीच स्वप्ना उधळताना तुला काहीच वाटत न्हवत,
नेहमी भेटल्य्वर घट हाथ धरणारी तू
आज तोच हात सोडताना माझ्या कडे तुझ्या डोळ्यांनी पाहिलं ही न्हवत ...

नेहमी तासन तास बोलणारी तू
अन " उद्या करशील ना रे फोन " असं बजावणारी तू
आज माझ्याशी कायमचा अबोला धरताना
तुला काहीच कसं वाटत नह्व्त...

एव्हढाच मी जर नकोसा होतो तर
आधी होकार का दिलास
अन एका वाटेवर आपण सुखाने चालत असताना
अर्ध्या वाटेवर माझी साथ सोडताना
तेव्हा तुझ्या जीवाला काहीच कसं वाटत नह्व्त...

काहीच कसं वाटत नव्हतं ...

कवी- एक तुटलेलं हृदय!

Monday, June 17, 2013

मन वेडं

मन वेडं,

प्रत्येकाच असतं
कुणाच कमी,
कुणाच जास्त असत..
मन वेडं...

...कधी ना कधी नक्की फ़सतं
कुणाच रडत बसतं
कुणाच उगाचच् हसतं
मन वेडं...

हे खुप नशीबवान असतं
आपल्याच नकळत हे तिच्यासोबत असतं
मन वेडं...

हे पाखरां सारख असतं
ते पंखाने उडत असतात
हे मात्र
पंखाविना उडत असतं
मन वेडं...

हे कधीच आपलं नसत
ते फ़क्त तिचच असत
कधी हरवल तर्
तिच्या सावली मागे सापडतं....
मन् वेडं

प्रत्येकाच असतंकुणाच कमी
कुणाच जास्त असत.....