Friday, December 14, 2012

तुला बघुन अजून जगावस वाटत...

तुझ्याशी बोलून बर वाटत... तुझ्यासहवासात
खेळावस वाटत....♥♥
तुझ्या विचारांच्या समुद्रात डुबावस
वाटत....♥♥
तुझ्याशी विनाकारण भांडावस
वाटत....♥♥
तू रुसलीस का मुद्दाम
तुला चीडवावस
वाटत...♥♥
पण खरच तू दररोज आनंदी राहवस

मनाला वाटत....♥♥
नको जाऊस
मला कधी सोडून...♥♥
कारण....,..????
तुला बघुन अजून जगावस वाटत...

Saturday, September 8, 2012

एकदा तरी आयुष्यात कुणी असेभेटावे...

एकदा तरी आयुष्यात कुणी असेभेटावे,
ज्याला आपल्या मनातले सर्व काही सांगावे,
सांगता सांगता आयुष्य पूर्ण सरुन जावे,
आणि सर्तानाही आयुष्य पुन्हा पुन्हाजगावे....

एकदा तरी आयुष्यात कुणी असेभेटावे,
ज्याला घेऊन सोबतीने खूप खूप चालावे,
चालता चालता दूरवर खूप खूप थकावे,
पण थकल्यावरही आधारसाठी त्याच्याकडेच पहावे......

एकदा तरी आयुष्यात कुणी असेभेटावे,
दुख त्याचे आणि अश्रू माझे असावेत,
सोबतीने त्याच्या खूप खूप रडावे,
आणि अश्रूंच्या हुंदक्यात सर्व दुख विरून जावे......

एकदा तरी आयुष्यात कुणी असेभेटावे,
आनंद त्याचा आणि हसू माझे असावे,
त्याच्यासाठी मी जगतच राहावे, जगतच राहावे,
आणि त्याच्यासाठी जगतानाच आयुष्य संपून जावे....... 

एकदा तरी आयुष्यात कुणी असेभेटावे,
ज्याच्या सोबतितल्या प्रत्येक क्षणाने सुखवावे,
उन्हात त्याने सावली तर पावसात थेंब व्हावे,
आणि मायेच्या थेंबानी मी चिंब भिजून जावे.......

Monday, July 30, 2012

सगळ्यांन साठी मी आहे

सगळ्यांन साठी मी आहे,
पण..??
माझ्यासाठी कुणीचं
नाही..
सगळे मला सगळं काही सांगतात,
पण..??
माझं ऐकणार असं कुणीचं नाही..
सगळ्यांच्या अडचणीत धावणारा मी,
पण..??
माझ्या अडचणीत,
मला हात देणारा असं कुणीचं नाही..
मित्र म्हणून असणारे असे खूप आहेत,
पण..??
मैत्री निभावणारा असं कुणीच नाही..
ती गेल्यावर..
रोज रडतो मी आता,
पण..??
माझे डोळे पुसणार असं
कुणीचं नाही..
माझ्यासाठी ती, अजूनही माझं विश्व आहे,
पण..??
तीच्यासाठी, आता मी कुणीचं नाही..
आता मी खूप एकटा आहे,
अन् माझ्या शिवाय, मला आता कुणीचं
नाही..
अन् माझ्या शिवाय, मला आता कुणीचं
नाही..:

Saturday, July 14, 2012

चुकलंच.... पण कुणाचं ??

कधी कधी माझं मन मला खायला उठतं,
मी तिला असं दुःखवायला नको होतं...

हां, झालं असेल काही उलटं सुलटं,
कदाचित ते तिच्या मनात नसेल सुद्धा..!!
मी कधी याचा विचारच का केला नाही?
आत्ताच का डोकं खायला लागलाय हा मुद्दा..??

पण तरीही ती माझीच होती,
कमीतकमी त्या क्षणापर्यंत तरी..!!
झालं गेलं विसरून जां !! असं म्हणायला पाहिजे होतं,
पण कुणी?, मी नाही म्हटलं... तिनं तरी??

तिला काय वाटत असेल आत्ता?
जे घडलं त्या दिवशी, याचा ती विचार करत असेल का...?
शेवटी मान्य करुन चूक तिनं केली घोडचूक ...पण,
मी काय करू? काय नको ? ...असं मलाच कोड्यात टाकलं .. ते का?

मी काहीच बोललो नाही.
बोलायचं होतं, पण शब्दच फुटले नाही..
बस्स.. डोळ्यात डोळे घालून बघत राहिलो,
पण कदाचित म्हणूनच ती तिथं थांबली सुद्धा नाही..!!

शेवटचा निर्णय तिचाच होता ,
त्यावर तरी मी काहीतरी बोलायला हवं होतं,
दुःखवायचं होतं तिला, म्हणून चूप राहिलो, पण.. आत्ता वाटतं..

मी तिला असं दुःखवायला नको होतं...
मी तिला असं दुःखवायला नको होतं........!!!!
की...? तिनं तरी मला असं दुःखवायला नको होतं...

Saturday, April 21, 2012

इथ भेटली तर भेटली वर पुन्हा भेटू नको

कधी हे करू नको
कधी ते करू नको
बस झाली राणी आता
डोक किर्र करू नको

कधी म्हणते हे आण
कधी म्हणते ते आण
खिसा फाटतो माझा इथे
बापाच माझ्या नाही दूकान

तुला ते गिफ्ट देण नको
ते रोज लिफ्ट देण नको
बस झाली राणी आता
डोक किर्र करू नको

कधी म्हणते मुलशि डयाम
कधी म्हणते खड़कवासला
माय बाप आहेत माझे
उभा आडवा त्यांनीच पोसला

ते तुझ रुसन नको
रस्त्याच्या कड्याला बसन नको
बस झाली राणी आता
डोक किर्र करू नको

कधी म्हणतेस खोट बोलतोस
कधी म्हणतेस कशाला झेलतोस
भेटायची इच्छा नव्हती तर
कशाला एवढा त्रास घेतोस

बेसिकली आता तूच नको
दूर नको.. जवळ नको..
इथ भेटली तर भेटली
वर पुन्हा भेटू नको

Tuesday, April 10, 2012

या पोरी म्हणजे पोरीच असतात

या पोरी म्हणजे पोरीच असतात,
 कधी गोड बुंदी कधी तिखट कचोरी असतात... 

जाणून घ्यायला थोड्या कठीणच असतात
सुंदर दिसणाऱ्या आपल्या नशिबात नसतात...

 ज्यांना आपल्यात इंटरेस्ट अश्या थोड्या कमीच असतात,
आपल्याला आवडणाऱ्या सहसा आधीच एंगेज असतात...

 नखरे ह्यांचे तसे खूप असतात,
 पक पक पक पक यांच्या तोंडाला टाळे नसतात,
आमच्या मनात टपरीवरची रु.५ ची कटिंग,
त्या मनात कॅफे डे ची रु.५५ ची कॉफी घेऊन असतात... 

सांभाळतात आम्हाला म्हणून
त्यांना गुन्हे सगळे माफ असतात,
 पण काही हि म्हणा....या पोरी एकदम भारी हसतात...
घायाळ करतात....परवानग ी न घेता एकदम मनात बसतात..................!!!!!!!!!!!

Thursday, March 15, 2012

भेट होती ती अनोळखी

भेट होती ती अनोळखी, पण ओळख सांगुन जाणारी,
प्रित होती ती साजेशी, हवी हवीशी वाटणारी,
काय नाते होते ते, जे गुपचुप जडले,
अनोळखी असुनही तुने, त्यात रंग भरले.....

वाढत होती ती मैत्री, पण त्यात काही औरच मजा होती,
नकळत काही घडत होते, ती कुणा एकाची सजा होती,
दिवस उलटत गेले, मैत्री वाढत गेली,
नाते बनले ते इतके घट्ट, न सोडायची आता साथ हा एकच हट्ट....

पण प्रत्येक गोष्टीला जसा मध्यांतर असतो,
तसा त्या मैत्रीला ही होता,
जवळ आलेले मित्र असे दुरावतील, असाच तो एक गेम होता,
दिवस गेले अंतर वाढले, जूळलेले हे नाते असे एकदम तानले,
पण ती आठवण अशीच ह्रुदयात होती,
कारण त्या मैत्रीची शपथ अजुनही  जिवंत होती.....

पुन्हा भेटले ते एका अशा वळनावर,
मैत्रीची साठवण होती त्या मनावर,
पण मनातील भाव कधी बाहेर आलेच नाही,
बोलूनही काही गोष्टी कधी कळल्याच नाही,
पण मैत्रीची ती हाक सतत जिवंत होती,
कारण मैत्रिमधेच ती अबोल नाती जूळली होती....

आजही ती मैत्री अशीच जिवंत आहे,
माझ्या मैत्रीच्या पुस्तकात सद्देव तिला मोठी किंमत आहे.....

Sunday, March 11, 2012

कॉलेज गारवा

Syllabus जरा जास्तच आहे
दर वर्षी वाटतो...
Chapters पाहून Passing चा
Problem
मनात दाटतो...

तरी lectures चालू राहतात
डोक्यात काही घुसत नहीं....
चित्र-विचित्र figures शिवाय
Board
वर काहीच दिसत नाही....

तितक्यात कुठून तरी Exam ची
Date
जवळ येते...
Sem मधले काही दिवस
नकळत चोरून नेते...

नंतर lecturers Extra घेउन
भरभरा शिकवत राहतात Master
Problems Example Theory सांगून
  Syllabus
लवकर संपवू पाहतात...

पुन्हा हात चालू लागतात...
मन चालत नाही....
सरांशिवाय वर्गामध्ये
कुणीच बोलत नाही...

Lectures संपून Submission चा
सुरु होतो पुन्हा खेळ..
journal Complete करण्यामध्ये
फार फार जातो वेळ...

चक्क डोळ्यांसमोर Syllabus
चुटकी सरशी Sampun जातो..
'
PL's मध्ये वाचून सुद्धा
Paper
का बर ........ जातो ?

Monday, February 27, 2012

दारु ची गोष्ट

दारु काय गोष्ट आहे,मला अजुन कळली नाही
कारण प्रत्येक पीणारा म्हणतो,मला काहीच चढली नाही
सर्व सुरळीत सुरु असताना,लास्ट पॅकपाशी गाडी अडते
दर पार्टीच्या शेवटी,ऐक क्वार्टर कमी पडते ::)

पीण्याचा प्रोग्राम म्हणजे जणु,वीचारवंतची गोलमेज परीषदच भरते
रात्री दीलेला शब्द प्रत्येकजण,सकाळच्या आत विसरते,
मी इतकीच घेणार असा,प्रत्येकाचा ठरलेला कोटा असतो
पॅक बनवनारा त्यदिवशी,जग बनवनार्या पेक्षा मोठा असतो
स्वताच्या स्वार्थासाठी,प्यायच्या आग्रहाचा कार्यक्रम घडते
दर पार्टीच्या शेवटी,ऐक क्वार्टर कमी पडते :o

पीण्याचा कार्यक्रम पीणार्याऐला,दरवेळेस नवीन पर्व असते
लोकांना अकँडेमीक्सपेक्षा पीण्याचा,क्षमतेवर गर्व असते
आपण हीच घेतो म्हणत,ऐकमेकाचे ब्रँडप्रेम जागवतात
वेळ आली आणि पैसा नसला की,देशीवरही तहान् भागवतात
शेवटी काय दारु दा‍रु असते,कोणतीही चढते
दर पार्टीच्या शेवटी,ऐक क्वार्टर कमी पडते >:(

पीणार्या मध्ये प्रेम हा,चर्चेचा पहीला वीषय आहे
देवदासचे खरे प्रेम पारो की दारु,मला अजुन संशय आहे
प्रत्येक पॅकमागे तीची,आठवण दडली असते
हा बाटलीत बुडला असतो,ती चांगल्या घरी पडली असते
तीच्या आठवणीत थर्टीची लेवल,लगेच सिक्स्टीला भीडते
दर पार्टीच्या शेवटी,ऐक क्वार्टर कमी पडते ;D

चुकुन कधीतरी गंभीर,वीषयावरही चर्चा चालतात
सर्वेजण मग त्यावर,P.HD. केल्यासारखे बोलतात
प्रत्येकाला वाटतेकी,त्यालाच यामधले जास्त कळते
ग्लोबल वार्मिंगची चर्चा,गावच्या पोटनीवडणुकीकडे वळते
जसा मुद्दा बदलतो,तसा आवाज वाढते
दर पार्टीच्या शेवटी,ऐक क्वार्टर कमी पडते :-[

फेकणे, मोठोपणा दाखवणे याबाबतीत् यांच्यासारखा हात नाही,
ऐरवी सींगल समोसा खाणारा गोष्टीत पीझ्झाशीवाय् खात नाही,
पैशे काय आहे ते फक्त खर्च करासाठीच असतात,
पॅकजवळ झालेली अशी गणिते सकाळी चहाच्या कटींगपाशी फसतात,
रात्री थोडी जास्त झालीमग त्याला कळते,
दर पार्टीच्या शेवटी,ऐक क्वार्टर कमी पडते... 8)

यांच्यामते मद्यपाण हा,आयुष्याचा महत्वाचा पार्ट आहे
बीयर पीण्यामागे सायन्स,तर देशी पीण्यामागे आर्ट आहे
यामुळे धीर येते ताकत येते,यात वेगळीच मजा असते
आयुष्याभराचा मावळा माणुस,त्या क्षणी राजा असते
याच्यामुळे आपल्याला घराच्याचिवड्याचे महत्व कळते
दर पार्टीच्या शेवटीऐक क्वार्टर कमी पडते... :'(

Thursday, February 16, 2012

कारण मी कधीच रिस्क घेत नाही

" रिस्क "
दारु पिताना मी कधीच रिस्क घेत नाही
मी संध्याकाळी घरी येतो तेव्हा बायको स्वयंपाक करत असते,
शेल्फमधील भांड्यांचा आवाज बाहेर येत असतो,
मी चोरपावलाने घरात येतो,
माझ्या काळ्या कपाटातून बाटली काढतो,
शिवाजीमहाराज फोटोतून बघत असतात,
या कानाचा त्या कानाला पत्ता लागत नाही,
कारण मी कधीच रिस्क घेत नाही .... ||||
वापरात नसलेल्या मोरीतल्या फळीवरुन मी ग्लास काढतो,
पटकन एक पेग भरुन आस्वाद घेतो,
ग्लास धुवून पुन्हा फळीवर ठेवतो,
अर्थात बाटलीही काळ्या कपाटात ठेवतो,
शिवाजीमहाराज मंद हसत असतात,
स्वयंपाकघरात डोकावून बघतो,
बायको कणीकच मळत असते,
तरी या कानाचा त्या कानाला पत्ता लागत नाही,
कारण मी कधीच रिस्क घेत नाही .... ||||
मी : जाधवांच्या मुलीच्या लग्नाचं जमलं का गं?
ती : छे! दानत असेल तर मिळेल ना चांगलं स्थळ!
मी परत बाहेर येतो, काळ्या कपाटाच्या दाराचा आवाज होतो,
बाटली मात्र मी हळूच काढतो,
वापरात नसलेल्या मोरीतल्या फळीवरुन मी ग्लास काढतो,
पटकन एक पेग भरुन आस्वाद घेतो, बाटली धुवून मोरीत ठेवतो,
काळा ग्लास पण कपाटात ठेवतो,
तरी या कानाचा त्या कानाला पत्ता लागत नाही,
कारण मी कधीच रिस्क घेत नाही .... ||||
मी : अर्थात जाधवांच्या मुलीचं अजून काही लग्नाचं वय झालं नाही..
ती : नाही काऽऽय! अठ्ठावीस वर्षांची घोडी झालीये म्हणे..
मी : (आठवून जीभ चावतो) अच्छा अच्छा ...
मी पुन्हा काळ्या कपाटातून कणीक काढतो,
मात्र कपाटाची जागा आपोआप बदललेली असते,
फळीवरुन बाटली काढून पटकन मोरीत एक पेग मारतो,
शिवाजी महाराज मोठ्ठ्याने हसतात,
फळी कणकेवर ठेवून, शिवाजीचा फोटो धुवून मी काळ्या कपाटात ठेवतो,
बायको गॅसवर मोरीच ठेवत असते,
या बाटलीचा त्या बाटलीला पत्ता लागत नाही,
कारण मी कधीच रिस्क घेत नाही .... ||||
मी : (चिडून) जाधवांना घोडा म्हणतेस? पुन्हा बोललीस तर जीभच कापून टाकीन!
ती : उगीच कटकट करु नका... बाहेर जाऊन गप पडा...
मी कणकेमधून बाटली काढतो, काळ्या कपाटात जाऊन एक पेग मळतो,
मोरी धुवून फळीवर ठेवतो,
बायको माझ्याकडे बघून हसत असते,
शिवाजीमहाराजांचा स्वयंपाक चालूच असतो,
पण ह्या जाधवांचा त्या जाधवाना पत्ता लागत नाही,
कारण मी कधीच रिस्क घेत नाही .... ||||
मी: (हसत हसत) जाधवांनी घोडीशी लग्न ठरवलं आहे म्हणे!
ती: (ओरडून) तोंडावर पाणी मारा!!
मी परत स्वयंपाकघरात जातो, हळूच फळीवर बसतो,
गॅसही फळीवरच असतो..
बाहेरच्या खोलीतून बाटल्यांचा आवाज येतो,
मी डोकावून बघतो ... बायको मोरीत दारूचा आस्वाद घेत असते,
ह्या घोडीचा त्या घोडीला पत्ता लागत नाही,
अर्थात शिवाजी महाराज कधीच रिस्क घेत नाहीत..
जाधवांचा स्वयंपाक होईपर्यंत्...मी फोटोतून बायकोकडे बघून हसत असतो...
कारण मी कधीच रिस्क घेत नाही...||||

असं तुझं प्रेम असावं...

गाभुळलेल्या चिंचेसारखं आंबटगोड ,
असं तुझं प्रेम असावं ,
तुझ्या नुसत्या आठवणीनेसुद्धा ,
मनात चैतन्य फुलून यावं...........

मऊ दुलईतल निष्पाप बाळ ,
तसं तुझं प्रेम असावं ,
डोळे मिटून विश्वास ठेवावा ,
असं तुझं वागणं असावं ...........

सख्याची मुरली राधेसाठी ,
असं तुझं प्रेम असावं ,
एकमेकांच्या हृदयातल,
शब्दांशिवायच कळावं.........

शांत डोहातले संथ ढग ,
असं तुझं प्रेम असावं ,
माझ्याही डोळ्यात प्रतिबिंब ,
फक्त तुझंच दिसावं.........

चकोरासाठीचं चांदणं ,
असं तुझं प्रेम असावं ,
तुझ्याशिवाय जगणं माझं ,
अशक्यच होऊन जावं ..........

निरांजनातली पवित्र ज्योत ,
तसं तुझं प्रेम असावं ,
लवलेश नसावा वासनेचा ,
आणि तरीही आपण एकरूप असावं ......................

माधुरी...........

Wednesday, February 15, 2012

नुकतीच आमची भेट झाली...!

नुकतीच आमची भेट झाली...!

मनातील शेवटची ईछा पुर्ण झाली

खुप सुदर दिसत होती ती आज
वर्णन तरी करु तिच मी
जे कधी मला जमलच नाही.

आज नेमकी तिने तेच विचारल

मी आज कशी दिसते?
सागु तरी काय आता तिला,
हा विचार करता-करताच वेळ निघुन गेला.

पुन्हा समोर असताना काही बोलू शकलो नाही

तिने आजही तेव्हढा वेळ मला दिलाच नाही
नतर खुप काही सुचल,
पण एकायला ती मात्र थाबलीच नाही

करु तरी काय माझ्या या मनाला?


मन आता मात्र त्रास देऊ लागले

सारख समोर तीला घेऊन आठवू लागले
पुन्हा जुण्या आठवणी आठवून,
ते ढसा-ढसा रडू लागले

विसरलो होतो तूला,

मग का भेट्लीस मला.
आता तूच साग,
कस समजाऊ माझ्या वेड्या मनाला?

तु नसताना कसे पाहु एकट्याला

तु नसताना कसे समजाऊ या मनाला
आता तरी नको जाऊस दुर
मझ्यासाठी नव्हे, माझ्या मनासाठी तरी,
समजव तुझ्या कठोर मनाला.